मुलाच्या क्रूरतेनं महाराष्ट्रात हाहाकार! आई- वडिलांना खोलीत नेलं अन् कुऱ्हाडीने वार करुन संपवलं…

चंद्रपूर जिल्हातील लोणी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी आई – वडिलांना खोलीत बंद करून कुऱ्हाडीने मुलाने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आईचा मृत्यू झाला आहे.

तसेच वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. आरोपी मनोज पांडुरंग सातपुते याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कमलाबाई सातपुते असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पांडुरंग सातपुते हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याबाबत पोलीस तपास सुरू असून कोरपना तालुक्यात येणाऱ्या लोणी येथील मनोज सातपुते या मुलाने आपल्या वयोवृद्ध आई – वडिलांना खोलीत बंद केले. तसेच त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले.

दरम्यान, यामध्ये कमलाबाई सातपुते यांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. जखमी अवस्थेत पांडुरंग सातपुते यांना उपचारासाठी कोरपना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्याठिकाणी दाखल झाले.

या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आईची प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर मेडिकल कॉलेजला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या घटनेनंतर आरोपी फरारी झाला होता.

पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने अत्यंत क्रूरतेने आईच्या डोक्यावर कुऱ्हाडीने चार आणि हातावर दोन वार करून आईला जागीच ठार केले. तर वडिलांच्या डोक्यावर दोन वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यानंतर तो वहिनीच्या मागे धावला. मात्र त्या लपून बसल्याने वाचल्या.

दरम्यान, ही घटना शेतीच्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुढील कारवाई कोरपना पोलीस करीत आहे. या घटनेमुळे मात्र राज्यात खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस घरच्यांचा तपास करत आहेत.