अनैतिक संबंधातून व्यक्तीला गाडीखाली चिरडून मारलं, अपघाताचा केला प्लॅन, अन्…; धक्कादायक माहिती उघड…

पुण्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधातुन एका व्यक्तीला गाडीखाली चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर यामध्ये अपघात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याबाबत सध्या पोलीस अधिकचा तपास करत आहेत. शाबिर कुरेशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर ही घटना घडली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचे अनेकांना वाटले. मात्र नंतर भयंकर माहिती समोर आली आहे.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुणे नाशिक महामार्गालगत एका हॉटेल समोर शाबिर कुरेशी हा व्यक्ती दुचाकीवर बसलेला असताना पाठीमागे भारधाव वेगाने आलेल्या कारने दुचाकीस्वाराला जागीच चिरडले. यामुळे मोठी पळापळ झाली.

यामध्ये त्याचा जागीच मृत्यु झाला. नारायणगाव पोलिसांनी आरोपी अभिजित सोनवणे याला ताब्यात घेतलं आहे. हा सर्व प्रकार अनैतिक संबंधातुन बदला घेण्यासाठी केल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोनावणे हा आपली कार घेऊन जाताना दिसत आहे. रिव्हर्स कार घेऊन या कुरेशीला चिरडलं आहे. साधारण दुपारच्या सुमारास ही घटना घडली. ही गाडी रिव्हर्स घेऊन कुरेशीच्या थेट अंगावर घातली आणि यात कुरेशीचा मृत्यू झाला.

नंतर हा अपघात असल्याचे सोनावणे याने सांगितले. अनैतिक संबंधातून हे केल्याचा आरोप देखील आहे. याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. याबाबत माहिती घेऊन चौकशी केली जात आहे. याबाबत लवकरच माहिती पुढे येईल.