बाबा आम्ही लग्न केलंय, आम्हाला शोधायचा प्रयत्न केला तर…; मुलीची धमकी अन् बापाचा टोकाचा निर्णय..

सध्या मुलीने कुटूंबाच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्यामुळे एखादी व्यक्ती किती टोकाचे पाऊल उचलू शकते, याचा प्रत्यय आला आहे. तेलंगणा राज्यात नुकत्याच घडलेल्या एका घटनेने एकच खळबळ उडाली आहे. येथील वारंगळ जिल्ह्याच्या इटिकालापल्ली गावाच्या सरपंचाने धक्कादायक कृत्य केले आहे.

येथील सरपंच मंडला रवींद्र यांची मुलगी काव्या श्री आणि त्याच गावात राहणारा जलगाम रणजित यांचं एकमेकांवर प्रेम होते. त्यांनी लग्न करायचं ठरवले. अस असलं तरी काव्याच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हते. यामुळे वाद सुरू झाला. नंतर काव्याने वडिलांच्या मनाविरुद्ध पाऊल उचलले आणि पळून जाऊन रणजितशी लग्न केले.

यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला. दोघांनी आपल्या कुटुंबीयांना व्हिडिओ संदेश पाठवला. यामध्ये त्यांनी आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं असल्याने त्यांनी आपल्याला माफ करण्याची विनंती केली. त्यांनी कुटूंबाशी संपर्क साधला.

मला माझ्या नवऱ्यासोबत सु खाने राहू द्या, असं काव्याने या व्हिडिओतून आपल्या आई-वडिलांना सांगितले होते. तसेच आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही दोघंही आत्महत्या करू, अशी धमकीही तिने कुटुंबीयांना दिली होती. यानंतर मात्र तिचे वडील चिडले.

त्यांनी या लग्नाला मदत करणाऱ्या त्याच्या मित्रांची घरं जाळून टाकली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, पाच दुचाकी वाहनांवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी घरात घुसखोरी करून नासधूस केली. त्यांनी घरातून 50 हजार रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. तसेच घर पेटवून दिले. या आगीत सगळं काही जळून गेलं आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.