तरुण प्रेयसीसोबत न्यूड डान्स करणं आलं अंगलट, व्हिडिओच झाला व्हायरल, नेमकं काय झालं?

मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी देहविक्रेय करणाऱ्या तरुणीबरोबर प्रेमात पडल्यानंतर नग्नावस्थेत केलेल्या डान्सचा व्हिडीओ शूट करुन एका व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलीस तपास करत आहेत. याबाबत एका तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी पीडित 54 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल करत होती. नग्नावस्थेतील व्हिडीओ त्याला दाखवून त्याच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करत होती. तिच्यासोबत अजून एक महिला होती.

तिने सुरुवातीला 10 लाखांची मागणी देखील केली. मी हा व्हिडिओ व्हायरल करेल. पैसे किंवा 8 तोळा सोन्याचे ब्रेसलेट मला दे अशी मागणी या तरुणीने पीडित व्यक्तीकडे केलेली. यामुळे हा व्यक्ती खूपच घाबरला होता. यामुळे त्याने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला.

याबाबत त्या व्यक्तीने नकार दिल्यावर तिने बनावट नावाने इन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. तिने हे व्हिडीओ अपलोड केले, तसेच व्यक्तीच्या जवळच्या लोकांना लिंक शेअर केली. यामुळे या व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणामध्ये सर्व पुरावे आणि माहिती गोळा केल्यानंतर पोलिसांनी या महिलेला अटक केली.

या महिलेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित व्यक्ती एका सुरक्षा एजन्सीमध्ये काम करते. ही व्यक्ती अंधेरीमधील चार बंगला परिसरात वास्तव्यास आहे. याबाबत पोलीस अजून तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. यामुळे अनेकांची लूट केली जात आहे. याबाबत पैसे किंवा इतर गोष्टींची मागणी केली जात आहे. यामुळे यावर आळा बसला पाहिजे.