शाहू महाराजांच ठरलं! पक्ष आणि उमेदवारीही झाली फिक्स, कोल्हापूरमध्ये मोठ्या घडामोडी…

सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची याबाबत महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. अखेर आता यावर तोडगा निघाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. भेटीनंतर आता हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून ही जागा शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला सोडण्याची तयारी केली आहे. तसेच याठिकाणी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यायचे जवळपास निश्चित झाले आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झालं आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता.

असे असताना विद्यमान खासदार हे शिंदे गटासोबत गेले. यामुळे या जागेवर शिवसेनेने आपला दावा केला होता. मात्र या जागेवरून शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस देखील आग्रही होती. यामुळे याबाबत बैठका सुरू होत्या.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती शाहू महाराज यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होता. मात्र या जागेवरून शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तिढा सुटला असल्याचे सांगितले जात आहे. कोल्हापूरची जागा सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने तयारी दर्शवली आहे.

याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. ही उमेदवारी काँग्रेसच्या कोट्यातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नाही.