दिपकचं तिच्यावर जिवापाड प्रेम होतं पण क्षणात झालं होत्याचं नव्हतं..; मुंबईतील घटनेने खळबळ

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील साकीनाका भागात एका महिलेची चालत्या रिक्षात गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. हत्या करण्यात आलेली महिला विवाहित होती.

याबाबत माहिती अशी की, दीपक बोरसे आणि विवाहिता रिक्षेतून जात होते. यावेळी या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दीपक बोरसेने धारदार शस्त्राने तिच्यावर वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. ती जखमी अवस्थेत त्याठिकाणी पडली.

तसेच त्याने स्वतःलाही जखमी करुन घेतलं आणि पळ काढला. असे असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचे लग्न झालेले आहे. तिला एक मुलगाही आहे.

तिचे तिच्या पतीशी पटत नसल्याने ती माहेरीच राहत होती. असे असताना काही दिवसांमध्येच तिचे दीपक बोरसेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र त्यांच्यात वाद होत होते. भांडण झाल्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे. घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ही एक संतापजनक घटना आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरीक दहशतीखाली आहेत, यामुळे अशा प्रकारच्या घटनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.