Deepti talpade : ‘श्रेयस कारमध्ये होता, पण कुणालाही हे माहिती नव्हतं…’, त्या रात्री नेमकं काय घडलं? पत्नी दिप्तीने सांगीतले सत्य

Deepti talpade :  काही दिवसांपूर्वीच अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला होता. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. गेले पाच-चहा दिवस त्याच्या कुटुंबियांसाठी अवघड होते. श्रेयस आता बरा झाला. आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

असे असताना त्याची पत्नी दिप्ती तळपदे हिनं एक पोस्ट शेअर करत तो आता रुग्णलायतून घरी आल्याचं सांगितलं. तिने सगळ्यांचे आभार मानले याबाबत पोस्ट लिहिली आहे. यामध्ये ती म्हणाली, माझं आयुष्य, माझा श्रेयस आज बरा होऊन घरी परतला. मी श्रेयससोबत नेहमी भांडायचे की, विश्वास तरी कोणावर ठेवायचा. आज मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय.

त्याचे उत्तर देव असे आहे. हे सगळं घडलं तेव्हा देव माझ्या सोबत होता. आता यापुढं त्यांच्या असण्यावर मी कधीच प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. आज मी त्या सगळ्यांचे आभार मानते ज्यांनी त्या संध्याकाळी माझी मदत केली. मी एकाला मदतीसाठी विचारले पण दहा हात पुढे आले.

विशेष म्हणजे श्रेयस कारमध्ये होता, हे त्यांना माहितीही नव्हतं, त्या लोकांना माहिती नव्हतं की, ते कुणाला मदत करत आहेत, तरी ते लोक माझ्या मदतीसाठी धावून आले. यामुळे यापेक्षा मोठं काय असू शकते. या सगळ्यात तिनं देवाचे आभार मानलेत.

रुग्लायतातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचेही तिने आभार मानले. दिप्तीने श्रेयससोबतचे फोटो शेअर केले आहेत. तसंच तिच्या भावना व्यक्त केल्यात. यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

तसेच जे माझ्यासाठी देवाच्या रुपात मदतीला धावून आले, त्या सगळ्यांचे मनापासून आभार. दरम्यान, श्रेयसला अटॅक आला होता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्याच्या पत्नीला अनेकांनी मोठी मदत केली होती.