Delhi Crime : एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवले अन् केलं भयानक कृत्य, घटनेने दिल्ली हादरली..

Delhi Crime : दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याचे निधन झाले.

याबाबत माहिती अशी की, वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. हा तरुण सतत त्रास देत असल्याने तरुणीने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी खुनाच्या कलमान्वये एफआयआर दाखल केला आहे.

याबाबत अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणीने माथेफिरु प्रियकरावरुन पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिलं आहे.

तरुण आणि तरुणी भाऊ-बहिणीच्या नात्यात होते. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अब्दुल्ला असे या तरुणाचे नाव आहे. मृत अब्दुल्ला हा त्याच्या कुटुंबासोबत संगम विहार भागात राहत होता.

अब्दुल्ला डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. घरात कोणी नसताना अब्दुल्लाच्या चुलत बहीणीने त्याला बोलवलं. अब्दुल्ला मामाच्या घरी पोहोचल्यावर सानियाने त्याला सोफ्यावर बसवले आणि चहा घेण्याच्या बहाण्याने आत गेली. तिने आधीच सगळा प्लॅन केला होता.

काही वेळाने तिने बाटलीत पेट्रोल आणून अब्दुल्लावर ओतले. यानंतर तिने काडीपेटीने अब्दुल्लाला पेटवून दिले. काही समजायच्या आधीच सगळं घडलं. आग लागल्यानंतर अब्दुल्ला लगेचच घरातून बाहेर पळाला.

त्याने रस्त्यावरच कपडे काढून फेकून देण्यास सुरुवात केली. असे असले तरी तो यामध्ये खूप भाजला होता. स्थानिक लोकांनी कशीतरी आग विझवली आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला.