वर्ल्डकपसाठी संघात निवड होऊनही ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूने घेतला संन्यास; निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेटजगतात खळबळ

2023 च्या विश्वचषकापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेने क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. विशेषत: म्हणजेच दक्षिण आफ्रिकेच्या चाहत्यांना याचा आनंद होणार नाही.

खरं तर, दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक याने विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करणार असल्याची घोषणा केली आहे. डी कॉकने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

मात्र आता त्याचा निर्णय धक्कादायक आहे. 30 वर्षीय डी कॉकचा हा तिसरा विश्वचषक असेल. याआधी, तो 2015 आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग होता. जिथे त्याने 17 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 450 धावा केल्या.

डी कॉकच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने २०१३ साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी 140 एकदिवसीय सामन्यांमध्ये 44.85 च्या सरासरीने आणि 96.08 च्या स्ट्राइक रेटने 5,966 धावा केल्या आहेत.

यामध्ये त्याच्या नावावर 17 शतके आणि 29 अर्धशतके आहेत. डी कॉकने 8 सामन्यात आपल्या संघाचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी 4 जिंकले आहेत आणि 3 गमावले आहेत. यष्टिरक्षक म्हणून त्याच्या नावावर 183 झेल आणि 14 स्टंपिंग्ज आहेत.

डी कॉकने आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले, त्यापैकी चार जिंकले आणि तीन गमावले. दक्षिण आफ्रिका 7 ऑक्टोबर रोजी दिल्लीत श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. डी कॉकने आयपीएलमध्येही आपल्या दमदार खेळीने सर्वांना प्रभावित केले होते. गेली अनेक वर्षे तो मुंबईकडून खेळत आहे. त्याने दीर्घकाळ दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले आहे.