राज्यात मोठ्या घडामोडी, आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार? नवी राजकीय समीकरणे

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी बातमी समोर येऊ शकते. आता स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. प्रहार संघटनेचे आता पक्षात रुपांतर होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरु आहे. आता ही संघटना प्रत्यक्षात राजकारणात सक्रिय होणार आहे.

राज्याच्या राजकारणात डॅशिग नेते असलेले आमदार बच्चू कडू हे संभाजीराजे छत्रपती यांच्यासोबत राजकीय मैत्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे मोठा पर्याय उभा राहणार आहे. स्वराज्य पक्ष, प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे.

संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. संभाजीराजे 9 ऑगस्टला अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. बच्चू कडू आणि संभाजीराजे यांची एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे. बच्चू कडू अनेकदा शेतकरी, कष्टकरींच्या प्रश्नांसाठी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक झालेले बघायला मिळाले आहेत. तर संभाजीराजे हे कोल्हापूर गादीचे वंशज असल्यामुळे त्यांच्याबद्दल शिवप्रेमींच्या मनात आदर आहे.

दरम्यान, दोन्ही नेत्यांना आगामी विधानसभेत आपापल्या प्रतिमेचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत दोन्ही पक्ष विधानसभेच्या किती जागांवर निवडणूक लढवतात? हे लवकरच समजेल. आता प्रत्यक्षात काय होणार याबाबत सविस्तर माहिती लवकरच समजेल.