Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, महायुती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार आहे. त्यांनी मुंबईमध्ये महायुती एकत्र असल्याचे ठरल्याचे सांगितले, आणि जिथे शक्य होईल, तिथे एकत्र येण्याचे आश्वासन दिले. मनसेचे राज ठाकरे महायुतीमध्ये सामील होणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सांगितले की राज ठाकरेंबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, आणि त्यांचा निर्णय त्यांच्यावरच असतो.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीमध्ये एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांनी विविध राजकीय प्रश्न विचारले. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होईल का? या प्रश्नावर त्यांनी “नाही” असे ठाम उत्तर दिले. फडणवीस यांच्या या उत्तरावर उपस्थितांकडून टाळ्याही वाजल्या.
फडणवीस यांनी एक रॅपिड फायर प्रश्न सत्रात उत्तर दिले, त्यामध्ये:
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होईल का?
- फडणवीस – “नाही”.
- लाडके उपमुख्यमंत्री कोण? अजितदादा की एकनाथ शिंदे?
- फडणवीस – “दोघेही माझे लाडके आहेत, आणि मी पण त्यांचा लाडका आहे”.
- लाडके ठाकरे कोण? उद्धव ठाकरे की राज ठाकरे?
- फडणवीस – “उद्धव ठाकरेंशी माझे संबंध कधीच तोडले गेले आहेत. राज ठाकरेंसोबत माझे संबंध राहिले आहेत”.
- लाडका मंत्री कोण? गिरीश महाजन की नितेश राणे?
- फडणवीस – “योजना सुरू केली आहे, अर्ज घेतले आहेत, प्रोसेसिंग सुरू आहे. निकष ठरले आहेत.”
- कुणी सर्वात जास्त नाराजीनाट्य करतं? अजितदादा की एकनाथ शिंदे?
- फडणवीस – “कोणालाही नाराजीनाट्य करत नाही. एकनाथ शिंदे भावनिक आहेत, तर अजितदादा प्रॅक्टिकल”.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा:
फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना सांगितले की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला कारण मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा त्यांचा राईट हॅन्ड आहे. त्याच्या कृत्यामुळे जनतेची अपेक्षा होती की नेतृत्वाने नैतिक निर्णय घेतला पाहिजे. फडणवीस यांनी आणखी सांगितले की, धनंजय मुंडे यांच्याविरोधात जर कुठेही पुरावा मिळाला, तर चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत, पण तशी कोणतीही माहिती मिळाल्याशिवाय कारवाई नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या मुलाखतीत राजकीय घडामोडी आणि नेत्यांशी संबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे उचलले गेले.