राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवार गट आहे तर दुसरा हा अजित पवारांचा गट आहे. सध्याचे संख्याबळ पाहता अजित पवारांकडे जास्त आमदार आहे. शरद पवारांचे अनेक विश्वासू नेते अजित पवारांसोबत गेले आहे.
विश्वासू नेतेच अजित पवारांसोबत गेल्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. पण यामध्ये एका नेत्याचे नाव चांगलेच चर्चेत आहे. ते म्हणजे धर्मराव बाबा आत्राम. आत्राम यांना शरद पवारांनी नक्षलवाद्यांपासून वाचवलं होतं तरी देखील ते शरद पवारांसोडून गेल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले आहे.
२७ एप्रिल १९९१ मध्ये आत्राम यांचे गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते. त्यावेळी आत्राम हे शरद पवारांचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात होते. त्यावेळी शरद पवांरांनीच त्यांची नक्षलवाद्यांपासून सुटका करत त्यांचा जीव वाचवला होता.
१९९१ मध्ये लोकसभा निवडणूक होती. त्यावेळी प्रचार करण्यासाठी आत्राम घराबाहेर पडले होते. त्यावेळी पीपल्स वॉर ग्रुपच्या काही नक्षलवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. अपहरणाबाबत कळताच शरद पवारांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यावेळी नक्षलवाद्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या शरद पवारांनी ऐकल्या. जवळपास १५ दिवस पोोलिसही शोध घेत होते. हेलिकॉप्टरनेही पाहणी केली जात होती. पण त्यानंतर शरद पवारांनी मागण्या पूर्ण केल्यानंतर आत्राम यांना सोडून देण्यात आले.
शरद पवार त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी आत्राम यांना काही होणार नाही याची पुर्णपणे काळजी घेतली. त्यानंतर आत्राम यांनी पुढे राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही शरद पवारांनी त्यांना मंत्रिपद दिले होते. पण आता त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्यावर सगळीकडून टीका केली जात आहे.