Dhule News : पडक्या घराच्या आडोशाला नको तो उद्योग, पोलिसांनी छापा टाकताच लोकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

Dhule News: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील पवन नगरात रात्रीच्या वेळी चाळीसगावरोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. याबाबत जुगार अड्डा चालवणाऱ्या म्होरक्यासह त्यांच्या साथीदारांचा तपास पोलीस करत आहेत.

येथील महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे पोलिसांनी सूत्र हलवली. पोलिसांनी याठिकाणी जाऊन पाहणी केली. या कारवाईत ५३ हजार ३०० रूपयांची रोकडसह मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

पोलिसांना याठिकाणी काही इसम जुगार खेळताना आढळून आले. काहीजण पळून जाण्याचा यशस्वी देखील ठरले. पथकाने आकाश प्रविण सोनवणे, जमीन रशीद अन्सारी, अश्पाक गुलाब सैय्यद, आयाज लतीफ शेख यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या पाच जणांवर चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, एएसपी ऋषीकेश रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली झाली.

दरम्यान, शरद परशुराम लाडे हा त्याच्या साथीदारांसह हा जुगार अड्डा चालवत होता. ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांच्या अंगझडतीत ५३ हजार ३०० रूपयांची रोकड, मोबाईलसह जुगाराची साधने मिळून आली आहेत. याबाबत तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस जेव्हा याठिकाणी गेले तेव्हा मोठी पळापळ झाली होती. अनेकांना याबाबत सुगावा लागला होता. यामुळे ते पळून देखील गेले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.