सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता काही ठिकाणी मतदान बाकी आहे. यानंतर काही दिवसांमध्येच निकाल लागणार आहे. असे असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होत आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले. आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना रिंगणार उतरवले आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच बहुजन समाज पक्षाकडून शोएब खतीब रिंगणात आहेत. अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव असा थेट सामना इथे होत आहे. याशिवाय बसपकडून शोएब खतीब निवडणूक लढवत आहेत. यामुळे याठिकाणी आता तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात २५ टक्के मतदार मुस्लिम आहेत.
दरम्यान, खतीब हे जुमा मशिदीचे विश्वस्त आहेत. कोरोना काळात त्यांनी याठिकाणी अनेकांना मदत केली आहे. या कामामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत विरोधक असलेले मिलिंद देवरा आता शिवसेनेत आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते.
तर गेल्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात लढलेले अरविंद सावंत आता काँग्रेससोबत आहेत. अडीच वर्षांपासून ते सेक्युलर झाले आहेत, असे म्हणत त्यांनी इतर उमेदवारांवर टीका केली आहे. यामुळे याठिकाणी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, तुमच्या पक्षाच्या अध्यक्षा मायावती आणि भाजपही काही काळ सोबत होत्या. त्यांची आघाडी होती. त्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास काय? असे खतीब यांना विचारण्यात आले. त्यावर बसपचा राजीनामा देईन, असे सांगितले यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.