रुट कॅनलसाठी भूल देऊन डॉक्टर करत होता धक्कादायक प्रकार, व्हिडिओ काढले अन् केला 7 वेळा बलात्कार

राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका डेंटीस्टने एक भयंकर कृत्य केलं आहे. रुट कॅनल करण्यासाठी आलेल्या महिला रुग्णाला भूल देऊन तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ या डॉक्टरने काढले.

यामुळे या महिलेला काही समजलं नाही. त्याने तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून भूल देत असल्याचे सांगितले. नंतर त्यांना बेशुद्ध केलं. यावेळी त्याने या महिलेसोबत नको त्या गोष्टी केल्या. तसेच त्याचं चित्रिकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. याचा त्याने फायदा घेतला.

नंतर काही वेळाने हेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळपास वर्षभर हा डॉक्टर तिच्यावर बलात्कार करत होता. याबाबत महिलेने देखील कोणाला याबाबत माहिती दिली नाही. तिला धमकी देण्यात आली होती.

वेळोवेळी 7 वेळा या नराधमाने महिलेवर बलात्कार केला. नंतर या महिलेला त्रास होऊ लागला. नंतर तिने हिंमत दाखवून डॉक्टर सुरेश सुंदेशा विरोधात भीनमाल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यामधील भीनमाल येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढल्यानंतरपासून तो मला पुढील चेकअपला निवांत वेळ काढून ये असं सांगायचा. रुट कॅनलसाठी वेळ लागतो. गर्दी नसेल तेव्हा तुला बोलवेन, असेही डॉक्टरने तिला सांगितले. डॉक्टरने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

दवाखान्यात बोलावून त्याने गर्दी नसेल तेव्हा तिला बोलावून संबंध ठेवले. यामुळे महिला वैतागली होती, याबाबत आता पोलीस तपास करत असून डॉक्टरची चौकशी केली जात आहे. हा डॉक्टर या महिलेला हा डॉक्टर व्हिडिओ कॉल देखील करून नको त्या गोष्टी करायला भाग पाडत होता.