Dr. Raja Dayanidhi : जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकलं मन! मजुराने विचारले साहेब पोते उचलायला मदत करता का? साहेबांनी लगेच…

Dr. Raja Dayanidhi : समाजात अनेक लोकं मोठ्या पदावर आहेत. पण अनेकजण आपले सर्वसामान्य आयुष्यच जगत असतात. मोठ्या पदावर असताना देखील सध्या एक जिल्हाधिकारी चर्चेत आले आहेत. एक सुखद अनुभव सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आला.

निवडणूक आयोगाची मिटिंग आटोपून बाहेर येताच त्यांना एका व्यक्तीने ओ साहेब, पोते उचलायला जरा हात लावता का? अशी विचारणा केली. यावर त्यांनी लगेच होणार दिला. यामुळे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हा व्यक्ती एक मोठा अधिकारी आहे हे त्या व्यापाऱ्यास माहीत नव्हते. यामुळे त्याने देखील निसंकोचपणे याबाबत विचारले. तसेच आपण ही पोती उचलून देत असताना आपण जिल्हाधिकारी आहे हे विसरून त्यांनी मदत केली. याचे एक सुखद अनुभव या निमित्ताने बघायला मिळाला.

हे क्षण चित्र त्यांचे मित्र उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी टिपले आहे. दरम्यान, याबाबत साहेबांनी बैठक आटोपून बाहेर येताच त्यांना रस्त्यावर असलेल्या कांदा विक्रेत्याने अचानक ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का? असे विचारले.

जिल्हाधिकारी असलेले डॉ.दयानिधी यांनी लगेच कोणताही विचार न करता त्यांनी तीन कांद्याची पोती उचलून डोक्यावर दिली. त्यांचा काहीवेळ यासाठी गेला, मात्र त्यांनी कसली तक्रार केली नाही, आणि व्यापाऱ्याला मदत केली.

याचवेळी उपवनसंरक्षक राहुल पाटील दूर होते. त्यांनी हे क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. सहकारी आपले चित्र टिपतायत याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांना नव्हती. नंतर हे फोटो व्हायरल झाले.