चीनच्या शानडोंग प्रांतात रविवारी पहाटे झालेल्या भूकंपात अनेक इमारती कोसळल्या. ज्यामध्ये 21 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिअॅक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.5 इतकी मोजली गेली. या भूकंपाचे धक्के देझोउ शहरातील पिंगयुआन काउंटीमध्ये जाणवल्याचे सांगण्यात येत आहे.
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरच्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे २.३३ च्या सुमारास या भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7 वाजेपर्यंत 126 घरांची पडझड झाल्याचे शेंडोंग टीव्हीने सांगितले. बीजिंग, टियांजिन, हेनान आणि हेबेई प्रांतांसह उत्तर चीनमधील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
चीनच्या शानडोंग प्रांतात झालेल्या या भूकंपात अनेक इमारती कोसळल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. ज्यात किमान दहा जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू डेझोऊ शहराच्या 26 किमी दक्षिणेस 10 किमी खोलीवर असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, अलिकडच्या काळात जगभरात भूकंपाचे धक्के अनेक वेळा जाणवले आहेत.
शनिवारीच अफगाणिस्तानमध्ये ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंदुकुश प्रदेशात होता. मात्र, या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. शनिवारी रात्री उशिरा दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
रिअॅक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ४.७ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
तुर्कस्तान आणि सीरियामध्ये यावर्षी ६ फेब्रुवारीला सर्वात धोकादायक भूकंप झाला होता. ज्यामध्ये 50 हजारांहून अधिक लोक मारले गेले. हजारो इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि लाखो लोक बेघर झाले. या भूकंपात 80 हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाने तुर्कस्तानला मोठा धक्का बसला, ज्यामध्ये त्याचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले.