Tamil Nadu Police : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्याला सरकारी कर्मचाऱ्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाने (DVAC) ही माहिती दिली आहे. ईडी अधिकाऱ्याची अटक अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली.
तामिळनाडू पोलिसांनी त्याला रंगेहात पकडण्यासाठी 8 किलोमीटर कारने त्याचा पाठलाग केला. दिंडीगुलमध्ये ताब्यात घेतल्यानंतर डीव्हीएसी अधिकाऱ्यांच्या पथकाने मदुराई येथील उप-प्रादेशिक ईडी कार्यालयात तपास केला.
यावेळी केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर राज्य पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. DVAC च्या अधिकृत प्रकाशनाने अटक केलेल्या अधिकाऱ्याची ओळख अंकित तिवारी म्हणून केली आहे, जो केंद्र सरकारच्या मदुराई अंमलबजावणी विभाग कार्यालयात अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
DAVC अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अंकित तिवारीने ईडी अधिकाऱ्यांसोबत स्वतःची टीम तयार केली होती. तो लोकांना धमकावून त्यांच्याकडून लाच मागायचा. तिवारी संशयित आरोपींना आश्वासन देत असे की त्यांच्याविरुद्ध ईडीमध्ये नोंदवलेला गुन्हा बंद करील.
वृत्तानुसार, DVAC अधिकारी तपासासंदर्भात मदुराई येथील केंद्रीय एजन्सीच्या कार्यालयात पोहोचले. या काळात अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी इंडो तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) जवान तैनात करण्यात आले होते. DVAC अधिकार्यांनी आरोपी अंकित तिवारीला दिंडीगुलमध्ये 20 लाख रुपयांच्या रोख रकमेसह पकडले.
लाच घेताना पकडता यावे यासाठी अधिकाऱ्यावर सतत नजर ठेवण्यात येत होती. अंकित तिवारी हा 2016 च्या बॅचचा अधिकारी आहे. याआधी त्यानी गुजरात आणि मध्य प्रदेशमध्येही काम केले आहे. DVAC चेन्नईने जारी केलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार, तिवारी हे केंद्र सरकारच्या मदुराई अंमलबजावणी विभाग कार्यालयात इंफोर्समेंट अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
ऑक्टोबरमध्ये तिवारी यांनी दिंडीगुलमधील सरकारी डॉक्टरांशी संपर्क साधला. ईडीच्या अधिकाऱ्याने त्या जिल्ह्यात त्याच्याविरुद्ध नोंदवलेल्या दक्षता खटल्याबद्दल सांगितले जे आधीच निकाली काढण्यात आले होते.
तिवारी यांनी डॉक्टरांना सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाकडून त्यांच्याविरुद्ध तपासाबाबत सूचना आल्या आहेत. अधिकाऱ्याने त्याला 30 ऑक्टोबर रोजी मदुराई येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.
कोटय़वधींची लाच मागितल्याने डॉक्टरने ५१ लाख रुपये देण्याचे मान्य केले.मदुराई कार्यालयात पोहोचल्यावर तिवारीने त्यांच्याकडे लाच मागितली. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जर त्यांनी 3 कोटी रुपये दिले तर त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई थांबवता येईल.
त्यानंतर तिवारी म्हणाले, ‘मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांच्या सांगण्यावरून मी 51 लाख रुपये लाच घेण्यास तयार आहे.’ 1 नोव्हेंबर रोजी लाचेचा पहिला हप्ता म्हणून 20 रुपये दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर तिवारीने त्यांना व्हॉट्सअॅपवर अनेक फोन आणि मेसेज केले ज्यात त्यांनी पूर्ण रक्कम न दिल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल, असे सांगितले.