अजितदादांच्या एंट्रीने शिंदेगट बिथरला! सत्ता सोडण्याच्या तयारीत? आमदारांची तातडीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाले आहे. तसेच अजित पवारांसह त्यांच्या काही आमदारांनी मंत्रिपदाचीही शपथ घेतली आहे. या सर्व कारणांमुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अजित पवार हे निधी देत नव्हते. ते शिवसेना संवपण्याचा प्रयत्न करत होते, असे आरोप करत शिंदे गटातील आमदारांनी महाविकास आघाडी सोडली होती. पण आता त्याच अजित पवारांना भाजपने सत्तेत घेतले आहे. आता शिंदे गटातील आमदारांना अजित पवारांचे आदेशही मानावे लागणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

अजित पवार आता सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिवसैनिकांची सहानूभूती अजून वाढणार आहे. त्यामुळे शिवसेनेचा मतदारही उद्धव ठाकरे यांच्याकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गोष्टींमुळे शिंदे गटातील आमदार नाराज आहे.

अनेक आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आजचे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहे.

तसेच सर्व कार्यक्रम रद्द करत एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार आणि खासदार यांची एक बैठक बोलावली आहे. ही तातडीची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. या बैठकीत ते आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा करणार आहे.

अजित पवार महायुतीत आल्यामुळे कोणते राजकीय परिणाम होणार आहे? यावरही चर्चा होणार आहे. वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार असून जे आमदार, खासदार नाराज झालेले आहेत, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जाणार आहे.

दरम्यान, अजित पवारांना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अजित पवारांना अर्थ खातं देऊ नये अशी शिंदे गटातील आमदारांची मागणी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेे यांनी समजूत काढण्यासाठी आज बैठक बोलावली आहे.