१६ आमदारांच्या अपात्रतेबाबत नार्वेकरांना लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावे अशी याचिका ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आमदारांना नोटीस बजावली आहे.
आमदारांनी येत्या सात दिवसांत आपले म्हणणे लेखी मांडावे अशा सुचना अध्यक्षांनी दिल्या आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेंशन वाढले आहे. त्यामुळे आता शिवसेना आमदारांची आज बैठक बोलवण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांना कायदेशीर सल्ला दिला जाणार आहे. तसेच नोटीसांबाबत चर्चा केली जाणार आहे. बाळासाहेब भवन याठिकाणी शिवसेनेची बैठक होणार आहे.
राहूल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या १५ आमदारांना नोटीस बजावल्या आहे. इतकेच नाही, तर ठाकरे गटातील १४ आमदारांनाही राहूल नार्वेकरांनी नोटीसा बजावल्या आहे.
शिंदेंच्या आमदारांना नोटीस बजावणे योग्य होते. पण ठाकरेंच्या आमदारांना नोटीस का बजावण्यात आली? असे म्हणत कायदेतज्ञ प्रश्न उपस्थित करत आहे. नोटीस बजावलेल्या सर्व आमदारांना ७ दिवसांमध्ये त्यांचे म्हणणे मांडायचे आहे.
सध्याच्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे गटातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहे. याबैठकीमध्ये आमदारांच्या अपात्रतेबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच पुढे काय करायचं याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.