जिगरी दोस्तांचा एकत्रच शेवट! गावात एकाचवेळी अंत्ययात्रा बघून गाव हळहळलं, नेमकं काय घडलं?

जळगाव येथून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी दोन जीवलग मित्रांचा भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे त्यांच्या कुटूंबावर शोककळा पसरली आहे.

हे दोघे लहाणपणापासून एकत्र होते, आणि त्यांनी एकत्रच जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भोसर शिवारातील महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आले.

ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली घडली आहे. विलास छगन बागूल (वय. ४४) आणि अंकुश काशिनाथ गायकवाड (वय. ३५ दोन्ही रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव) असे मयत दोन्ही मित्रांची नावे आहेत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. दोन्ही जिगरी मित्र म्हणून गावात ओळख होती. बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकीने सांगवी ता. चाळीसगाव येथे कामाच्या निमित्ताने जात होते.

चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील महामार्गारून दोघेजण जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एचआर ६२ ए १०८३ ) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले गेले.

त्यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एकत्रच जीवलग मित्रांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलीस याबाबत तपास करत असून मृत दोघांवर दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.