Esha Deol : ईशा देओलने घेतला घटस्फोट; 11 वर्षांनंतर ‘या’ कारणामुळे मोडला हेमामालिनीच्या लेकीचा संसार

Esha Deol : अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खुद्द ईशा देओलने याला दुजोरा दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे.

एका मुलाखतीत ईशा आणि भरत म्हणाले, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या आयुष्यातील हा बदल आपल्या दोन्ही मुलांसाठी चांगला असेल. ‘तुम्ही आमची प्रायव्हसी संभाळू’, असेही ते म्हणाले. एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. ईशा देओल आणि भरत तख्तानी हे 11 वर्षाच्या संसारानंतर विभक्त झाले आहेत.

काही काळापूर्वी ईशा-भरत परफेक्ट कपल गोल करताना दिसले होते, पण दोघेही खूप दिवस एकत्र दिसले नाहीत. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही भरत आले नव्हते. ईशाने 2012 मध्ये बिझनेसमन भरतसोबत लग्न केले, त्यानंतर ती चित्रपटांपासून दूर राहिली.

या जोडप्याला राध्या आणि मियारा या दोन मुलीही आहेत. लग्नानंतर ईशा ‘मांजा’ सारख्या काही तेलुगु चित्रपटात दिसली होती. मुलांच्या जन्मानंतर ईशा आपला सगळा वेळ मुलींसोबत घालवत होती. ईशा देओलनं काही वर्ष उद्योगपती भरत तख्तानीला डेट केलं. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.

आता लग्नाच्या जवळपास 11 वर्षांनंतर ईशानं भरतला घटस्फोट दिला आहे. ईशानं 2002 मध्ये रिलीज झालेल्या कोई मेरे दिल से पुछे या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ईशा आणि भरत यांच्या घटस्फोटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सुरु होती.

ईशा देओल ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशाने 2002 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता ईशा आणि भरत या दोघांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या घटस्फोटाची माहिती चाहत्यांना दिली आहे. यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.