Team India : सहाव्या विजयानंतरही टेंशनमध्ये आली टीम इंडिया, मोठी समस्या आली समोर, वाढतील वर्ल्डकपमधील अडचणी

Team India : भारतीय क्रिकेट संघाने या आयसीसी विश्वचषकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाने सलग 6 सामने जिंकले आहेत. भारताने रविवारी, २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंडविरुद्ध एकतर्फी विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले.

या विजयामुळे टीम इंडियाला पहिल्यांदाच या गोष्टीचा सामना करावा लागणारे ज्याची चाहत्यांना भीती वाटत होती. आता रोहित शर्मा आणि संघाला आगामी सामन्यांमध्ये या समस्येवर तोडगा काढावा लागेल, अन्यथा समस्या वाढू शकते.

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत सर्व सामने जिंकणारा एकच संघ आहे. भारताशिवाय या स्पर्धेत खेळलेल्या सर्व 9 संघांनी पराभवाची चव चाखली आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी विजयी मोहीम सुरू केली होती.

अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडनंतर त्याने इंग्लंडसोबत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सातत्य राखले. इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही टीम इंडियाचे टेन्शन वाढले होते. कारण असे आहे की बरेच चाहते आधीच चिंतेत होते.

आतापर्यंत भारतीय संघाने पहिले पाच सामने लक्ष्याचा पाठलाग करून जिंकले होते आणि आघाडीच्या फळीची कामगिरी चांगली होती. भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून, अफगाणिस्तानचा 8 विकेट्सने, पाकिस्तानचा 7 विकेट्सने, बांगलादेशचा 7 विकेट्सने आणि न्यूझीलंडचा 4 विकेट्सनी पराभव केला.

या स्पर्धेत पहिल्यांदा इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला केवळ 229 धावांपर्यंत मजल मारता आली होती. आगामी सामन्यांमध्ये भारताला प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारता आली नाही, तर अवघड जाईल.

ऑस्ट्रेलियाला गोलंदाजांनी केवळ 199 धावांवर रोखले तर पाकिस्तानला केवळ 191 धावा करता आल्या. बांगलादेशचा संघ 256 धावा करू शकला. अफगाणिस्तान संघाने 272 धावा केल्या होत्या तर न्यूझीलंड संघ 273 धावांपर्यंत मजल मारू शकला.

भारताला या स्पर्धेत आतापर्यंत 300 धावांचा पल्ला गाठता आलेला नाही, तर अव्वल 4 मध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेने चार वेळा अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन संघानेही 4 वेळा अशी कामगिरी केली आहे.