राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ! माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये जाणार? आमदारकीचा दिला राजीनामा…

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. यामुळे त्यांचा प्रवेश फिक्स मानला जात आहे.

या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या संपर्क होत नाही. यामुळे चर्चा सुरू झाली आहे. अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू आहे.

भाजपच्या कार्यालयात काँग्रेस नेत्याच्या पक्षप्रवेशाची तयारी सुरु आहे. हा नेता काँग्रेसचा बडा नेता असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हेच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे. यामुळे लवकरच याबाबत माहिती समोर येईल.

मागच्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यातच आज आलेल्या या बातमीने अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतील याची दाट शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेसला धक्का बसणार आहे.

दरम्यान, या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले हे दिल्लीत गेले आहेत. यामुळे आता अशोक चव्हाण नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे.