नापास झालो म्हणून मुलगी सोडून गेली, पण पास झाल्यावर त्याने असं काही केलं की राज्यात झाली चर्चा, तिच्या घरासमोर जाऊन…

आपल्याकडे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. यामध्ये यश मिळावे ही सर्वांची इच्छा असते. यश मिळवून अधिकारी व्हावे असे स्वप्न अनेक तरुण-तरुणींचे असते. यासाठी तरुण- तरुणी भरपूर मेहनत आणि अभ्यास करतात. मात्र प्रत्येकाच्या नशिबात ही गोष्ट नसते.

एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा नक्कीच अभ्यासाची प्रेरणा मिळेल. यामध्ये एका तरुणाची ही कहाणी आहे. हा तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता मात्र, त्याला परीक्षेत अपयश आले. त्याने प्रयत्न प्रामाणिक केलेले असतात.

परीक्षेत अपयश आल्याने त्याच्यावर प्रेम करणारी प्रेयसीच त्याला सोडून गेली. अशा परिस्थितीत हा तरुण डगमगून गेला नाही. या तरुणाने नैराश्यात न जाता उलट जोमाने अभ्यास सुरू केला. तसेच नंतर त्याने यश प्राप्त केले. या तरुणाने पुढच्याच वर्षी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले. याचा अनुभवच त्याने इतर विद्यार्थ्यांसमोर शेअर केला आहे.

याबाबत व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ 74_motivation_khaki नावाच्या इस्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओत हा तरुण सांगत आहे की, राज्यसेवा परीक्षेची तयारी करत होतो. तेव्हा मला प्रेमाचा ढेकूण चावला. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014 नापास झालो तेव्हा हा ढेकूण सोडून गेला.

यावेळी मला आपण पास झालो की ढेकणं आपल्या जवळ येतात. मग नंतर अभ्यास केला. त्यानंतर माझा सत्कार करण्यात आला. हे सर्व झाल्यावर 75 तोफा आणल्या आणि जी प्रेयसी सोडून गेली होती तिच्याच दारात वाजवून दिल्या, यावेळी एकच हशा पिकला. हा व्हिडिओ खूपच मजेशीर असला तरी यामध्ये शिकण्यासारख खूप काही आहे.

दरम्यान, परिस्थिती काहीही असो खचून न जाता व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला यश नक्की मिळू शकते. त्यामुळे समस्यांवर मात करुन यश मिळवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा यश तुमच्या दाराशी नक्कीच येईल, असा संदेश त्याने सर्वांना दिला आहे.