Crime News :काळजाला चटका लावणारी घटना; गर्भवती सुनेच्या डोक्यात सासर्‍याने कुऱ्हाडीने केले सपासप वार अन्…

Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात २३ जानेवारीला दुपारी एक धक्कादायक घटना घडली. एका सासऱ्याने नऊ महिन्याच्या गर्भवती सुनाची आणि आठ वर्षांच्या नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर शहरातील तामगांव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गायकी वाडीतील नारायण गायकी (वय 65) याने आज दुपारी घरात असताना अचानक आपल्या नऊ महिन्याच्या गर्भवती सुन अश्विनी गणेश गायकी (वय 24) आणि आठ वर्षांच्या नातवा समर्थ देवानंद गायकी या दोघांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

या हल्ल्यात नातू समर्थ जागीच ठार झाला तर सुन अश्विनी गंभीर जखमी झाली. नातेवाईकांनी जखमी अश्विनीला तातडीने रुग्णवाहिकेतून वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती.

तिला पुढील उपचारासाठी शेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तामगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी नारायण गायकी याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नारायण गायकी हा व्यसन करतो. त्याला नेहमी दारूच्या नशेत घरी रागावून भांडण करायची सवय होती. आजही तो दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने अचानक सुन अश्विनी आणि नातवावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत नातू समर्थ जागीच ठार झाला तर सुन अश्विनीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ही महिला ८ ते ९ महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने संग्रामपूर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असले तरीही या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करत आहे. सध्या या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.