बुर्ज खलिफात अनेक मजले, खासगी विमाने, पण 18000 कोटींची कंपनी विकली फक्त 74 रुपयांत, नेमकं काय घडलं…?

बी. आर शेट्टी हे एक नावाजलेल नाव आहे. जेव्हा अब्जाधीशांबद्दल बोललं जातं तेव्हा त्यांचे नाव नक्की समोर येत. एकेकाळी जगातील सर्वात उंच इमारतीत बुर्ज खलिफात अनेक मजल्यांचे ते मालक होते, त्यांच्या मालकीचे एक खासगी जेट होते, अनेक आलिशान गाड्या होत्या.

सध्या देशात फोर्ब्सच्या डेटानुसार, भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी, 113.3 अब्ज (अंदाजे रु. 9 लाख 43 हजार कोटी) च्या एकूण संपत्तीसह, जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत अव्वल स्थानी आहेत. सध्या ते जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तसेच या यादीत भारतीयांचे अनेक नावे आहेत.

यामध्ये गौतम अदानी 18 व्या स्थानावर आहेत. मात्र अनेकांवर या यादीतून बाहेर पडण्याची देखील वेळ आली आहे. भारतीय अब्जाधीश बावगुथू रघुराम शेट्टी आहेत, ज्यांना बीआर शेट्टी म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा एक वेगळा इतिहास आहे. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त 665 रुपये होते.

त्यावर ते आखाती देशात आले होते. त्यांनी UAE मधील सर्वात मोठ्या आरोग्य ऑपरेटरपैकी एक NMC हेल्थची त्यांनी स्थापना केली. या कामगिरीने ते अब्जाधीशांच्या यादीत विराजमान झाले. यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपला कारभार वाढवला आणि पैसे मिळवले.

बीआर शेट्टी यांचे करिअरच्या शिखरावर असताना त्यांची 18,000 कोटी रुपयांची संपत्ती होती. या भारतीय अब्जाधीशाने प्रचंड माया गोळा केली आणि ऐशोआरामाचे आयुष्य जगणयाचा प्रयत्न केला. त्यांची मोठी संपत्ती होती. बुर्ज खलिफा मधील दोन मजले, खाजगी जेट आणि मेबॅक आणि रोल्स रॉयस सारख्या अनेक महागड्या गाड्यांचा समावेश होता.

दुबई अनेक ठिकाणी त्यांची मालमत्ता होती. दरम्यान, 2019 मध्ये, बीआर शेट्टी यांच्या व्यवसाय साम्राज्याला उतरती कळा लागली. जेव्हा कार्सन ब्लॉकच्या नेतृत्वाखालील यूके- आधारित गुंतवणूक संशोधन फर्मने त्यांच्यावर वास्तविक कर्ज लपवण्यासाठी रोख प्रवाह वाढवल्याचा आरोप केला. यामुळे ते अडचणीत आले.

पुढे NMC हेल्थच्या शेअर्समध्ये मोठी घट झाली. ती अधिक काळ तशीच राहिल्याने त्यांना पुन्हा बिझनेसमध्ये जम बसवता आला नाही. बीआर शेट्टी यांना अखेरीस त्यांची कंपनी इस्रायली-यूएई कन्सोर्टियमला अवघ्या 74 रुपयांमध्ये विकावी लागली. या माजी भारतीय अब्जाधीशाची कहाणी गेल्या सगळ्यात वेगळी आहे.