वारंवार लघवी येणे हे फक्त मधुमेहाचेच नव्हे तर ‘या’ जीवघेण्या आजाराचेही आहे लक्षण

अनेकदा पुरुषांना दिवसभरात वारंवार लघवी करण्यासाठी जावे लागते. ही एक नैसर्गिक क्रिया आहे. असे अनेकांना वाटत. यामुळे बरेच लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि बरेच लोक याला मधुमेहाचे कारण मानतात. मात्र आता याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुरुषांमध्ये वारंवार लघवी होण्यामागे आणखी काही कारण असू शकते. पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरमुळे दिवसातून अनेक वेळा लघवीची समस्या येऊ शकते. यामुळे याकडे दुर्लक्ष करणे अनेकांना मोठी समस्या निर्माण करू शकतं. द लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की वारंवार लघवी होणे हे प्रोस्टेटच्या वाढीचे लक्षण असू शकत.

यामुळे प्रोस्टेट कर्करोग होतो. रुग्णांवर केलेल्या संशोधनात ही माहिती समोर आली आहे. वारंवार लघवी होत असेल आणि मधुमेह किंवा UTI ची समस्या नसेल, तर त्या व्यक्तीने PFA चाचणी देखील करून घ्यावी. नाहीतर पुढे अनेक समस्या निर्माण होतील.

दरम्यान, ही चाचणी प्रोस्टेट कर्करोगाविषयी माहिती देते. प्रोटेस्ट कर्करोग हा पुरुषांमधील दुसरा प्रमुख कर्करोग आहे. यामध्ये अनेकांचे जीव देखील जातात. यामुळे याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. वय वाढले की याचा त्रास देखील वाढणार आहे.

या कर्करोगाचा धोका पुरुषांमध्ये वाढत्या वयानुसार वाढतो, कारण वृद्धांना प्रोस्टेट कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे वेळोवेळी नियमित तपासणी करून घेणेही महत्त्वाचे आहे.

याचे कारण म्हणजे कॅन्सरची लक्षणे शक्यतो कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यातच आढळतात. त्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो आणि बरे होण्याचे प्रमाण कमी होते. अशी लक्षणे कॅन्सर वाढत असताना दिसतात. त्यामुळे वाढत्या वयाबरोबर या लक्षणांकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.