बुलढाणा येथील खामगावमध्ये सुटालपुरा भागात येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात एक व्यक्ती हुबेहूब श्री संत गजानन महाराज यांच्या वेशभूषेमध्ये अचानक प्रकट झाल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबतची माहिती सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली.
ही व्यक्ती कोण कुठून कशी आली याबाबत एक ना अनेक प्रश्न सर्वांना पडायला लागले. यामुळे याची राज्यात चर्चा सुरू आहे. गजानन महाराजांच्या वेशभूषेतील व्यक्तीने परिसरातील सातव नामक व्यक्तीकडे मला भोजन करायला द्या, अशी मागणी केली.
त्यांना या व्यक्तीने जेवण देखील दिले. या व्यक्तीला शेजारच्यांनी सातव यांच्याकडे जेवताना बघितले. त्यामुळे सातव यांच्या घरात गजानन महाराज प्रगटले, असे त्यांना वाटले. यामुळे ही बातमी बाहेर पसरली.
यामुळे त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकं का येत आहेत हे देखील कोणाला समजत नव्हते. शेवटी पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. दरम्यान, धनंजय वाजपेयी नामक व्यक्तीने या गजानन महाराज यांच्या वेशभूषेतील व्यक्तीला शेगाव येथे सोडून दिल्याची माहिती समोर आली.
असे असले तरी नेमकी ही व्यक्ती फक्त वेशभूषा धारण करून आली होती का? की अजून काही याबाबत स्पष्ठ माहिती समोर आली नाही. शहरातील अत्यंत जुने गजानन महाराजांचे मंदिर आहे. श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी याठिकाणी येतात.
तिथेच ही व्यक्ती अवतरली होती. विदर्भाची पंढरी म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव प्रसिद्ध आहे. राज्यभरातून हजारो भाविक येथे वर्षभर येत असतात. यामुळे सध्या या व्यक्तीमागे नेमकं काय दडल आहे, हे लवकरच बाहेर येईल.