---Advertisement---

Jalna : महाराष्ट्र पुन्हा हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

---Advertisement---

Jalna : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिलांविरुद्ध वाढत्या गुन्ह्यांनी चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. जालना जिल्ह्यात एका 20 वर्षीय गतिमंद विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, चंद्रपूरमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने खळबळ माजली आहे.

जालना: गतिमंद विवाहितेवर सामूहिक अत्याचार

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात ही अमानुष घटना घडली. 3 मार्च रोजी 20 वर्षीय महिला शेतात जळणासाठी लाकडे आणण्यास गेली असता, तिथे तिला तिघा नराधमांनी जबरदस्तीने अत्याचाराचा बळी बनवले. आरोपींमध्ये सद्दामखा अजमेरखा पठाण, सादिकखा शफीकखा पठाण आणि फारुखा जीलाणी खा पठाण यांचा समावेश आहे.

पीडित महिलेला धमकी दिल्याने तिने सुरुवातीला कुणालाही हा प्रकार सांगितला नाही. मात्र, अखेर 20 मार्च रोजी रात्री तिने हिम्मत एकवटून भोकरदन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींना अटक केली असून त्यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चंद्रपूर: 14 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चोरा गावात 14 वर्षीय मुलीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात संतापाची लाट उसळली आहे. 21 मार्च रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सदर मुलगी काल संध्याकाळपासून घरातून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी तिचा शोध घेत असताना विहिरीत मृतदेह सापडला.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, पीडितेच्या कुटुंबीयांनी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अधिक तपासासाठी मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

या घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---