World Cup 2023 : भारताला वेगळा चेंडू देतात त्यामुळेच त्यांचे गोलंदाज विकेट घेतात; गंभीर आरोपांनी हादरले क्रिकेटजगत

World Cup 2023 : सध्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या ७ पैकी ७ लढतीत विजय मिळवला आहे. आता भारताच्या या कामगिरीवर पाकिस्तानच्या पोटात दुखू लागले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूच्या डोक्यावर परिणाम झाला की काय असे तुम्हाला वाटले. पाकिस्तानचे क्रिकेटपटू हसन रजा याने हे वक्तव्य केले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात पदार्पण केले होते.

क्रिकेटच्या मैदानावर रजा यांना फार काही कमाल करून दाखवता आली नाही. त्यामुळे ते संघातून बाहेर झाला. आता त्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या मते आयसीसीकडून भारताला गोलंदाजीसाठी वेगळा चेंडू दिला जातो आहे.

जेव्हा फलंदाजी सुरू असते तेव्हा भारताचे खेळाडू चांगले खेळतात. पण भारताची गोलंदाजी सुरू होते तेव्हा शमी आणि सिराज हे असे गोलंदाज वाटतात जसे आम्ही द.आफ्रिकेविरुद्ध एलन डोनाल्ड आणि मखाया एटिनी यांच्या सोबत खेळायचो.

हसन यांच्या मते आयसीसी किंवा बीसीसीआय वेगळा चेंडू देत आहे. या चेंडूचे परिक्षण करण्याची गरज आहे, असा अजब दावा त्यांनी केला आहे. यामुळे सध्या याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

यावर अनेकांनी आता प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान, वानखेडे मैदानावर २ नोव्हेंबर रोजी झालेल्या लढतीत भारताने श्रीलंकेवर ३०२ धावांनी विजय मिळवला. यामुळे भारतीय गोलंदाजांचे कौतुक केले जात आहे.