लोकसभा निवडणुकीचं तिकिट कापल्यानंतर गोपाळ शेट्टींचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आज सकाळीच….

भाजपने काल लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत २० जणांची नावं आहेत. तसेच काहींची तिकिटे देखील कापण्यात आली आहेत. यामध्ये गोपाळ शेट्टींसह भाजपाच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे.

आता गोपाळ शेट्टींची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला तिकिट मिळालं नाही म्हणून कार्यकर्ते धरणे आंदोलन करत आहेत. मात्र ती त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. आंदोलन करणं हे कार्यकर्त्यांचा अधिकार आहे. मला तिकिट मिळालं नाही त्यामुळे त्या कार्यकर्त्यांना धक्का बसणं हे स्वाभाविक आहे.

तसेच सातवेळा मला तिकिट मिळालं. मी चांगलं काम केलं आहे. आज सकाळीच मला समजलं होतं की मला तिकिट मिळणार नाही. मी त्यानंतर आशिष शेलार यांची भेट घेतली. मी माझी कामं करणं सोडणार नाही. माझं काम सुरूच राहील, असेही ते म्हणाले.

आता मी तणावमुक्त झालो आहे. मला माझ्या कार्यकर्त्यांनी खूप चांगली साथ दिली आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपाने चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे. भाजपाने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियूष गोयल यांना तर मुंबई उत्तर पूर्वमधून मनोज कोटक यांच्या जागी मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.

तसेच बीडमधून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे, तर जळगावमधून उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे नवीन उमेदवार किती प्रभाव पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजून काही उमेदवार जाहीर करण्यात येणार आहेत.

मोदीजी खूप चांगलं काम करत आहेत. आपण सगळ्यांनीच त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे यात काही शंकाच नाही. माझं तिकिट कापलं गेलं आहे त्यामुळे काही काळासाठी वाईट वाटेल, असेही गोपाळ शेट्टी यांनी म्हटले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.