Greater Noida: हृदयद्रावक! 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेत महिलेची 16 व्या मजल्यावरून उडी, माय-लेकींचा जागीच मृत्यू

Greater Noida: ग्रेटर नोएडा येथील ला रेसिडेन्सिया सोसायटीतून एक दु:खत बातमी समोर आली आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सोसायटीत आई आणि भावासोबत राहणाऱ्या 33 वर्षीय महिलेने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन 16व्या मजल्यावरून उडी मारली. यामुळे आई आणि मुलगी दोघींचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव सारिका आहे. ती अमेरिकेत राहत होती. तिच्या मुलीच्या जन्मापासून ती आरोग्याच्या विविध समस्यांशी झुंज देत होती. यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास एका महिलेने आपल्या मुलीसह सोसायटीच्या 16 व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी महिला आणि मुलीला रुग्णालयात दाखल केले. जिथे दोघींना मृत घोषित करण्यात आले.

पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. त्यावेळी, सारिकाला काही आजाराने ग्रासले असून ती पतीशिवाय तिची आई आणि भावासोबत राहत होती अस सांगण्यात आले. त्यामुळे सारिका देखील डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळे तिने मुलीला सोबत घेऊन आत्महत्या असावी, असे सांगितले जात आहे.

या घटनेच्या दोन दिवस आधी कुटुंबाने सारिकाच्या 4 वर्षांच्या मोठ्या मुलाचा वाढदिवस साजरा केला होता, ज्यामध्ये सारिकाच्या सासरच्या लोकांनीही सहभाग घेतला होता. तर दोन दिवसांनी त्यांनी रात्रीचे जेवण केले आणि सारिका रात्री तिच्या खोलीत झोपायला गेली होती. मात्र त्याच रात्री तिने मुलीसोबत उडी घेत आत्महत्या केली.त्यांने हे फार उशीरा समजले, अशी माहिती तिच्या कुटूंबातील व्यक्तींनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.