हातात हिरवा चुडा, अंगावर साडी, हात बांधलेले, रक्त सांडलेले, विद्यार्थ्याची भयंकर अवस्थेत आत्महत्या…

मध्य प्रदेशच्या इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका महाविद्यालयीन तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच आत्महत्या करण्याआधी या तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

ही आत्महत्या ही काही घातपात याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे. पुनीत दुबे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, पुनीत हा रायसेनचा रहिवासी होता. तो एमपीपीएससी करत होता. पुनीत ३ वर्षांपासून इंदूरमध्ये अभ्यास करत होता.

पुनीत आई, वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो दुसऱ्या वर्षात शिकत होता. शुक्रवारी रात्री पुनीतच्या कुटुंबियांनी त्याला फोन केला होता. पण त्याने पुनीतने कॉलला प्रतिसाद दिला नाही. यानंतर कुटुंबियांनी इंदूरमध्ये राहणाऱ्या एका नातेवाईकाशी संपर्क साधला. नंतर त्याचा शोध घेतला गेला.

त्यांना पुनीतच्या घरी गाठवले. त्यांनी पुनीतचे घर गाठून दार ठोठावलं, पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी खोलीत डोकावून पाहिलं, तेव्हा त्यांना मृतदेह दिसला. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी याबाबत लगेच इतरांना माहिती दिली.

पुनीतने आत्महत्या करण्याआधी त्याने महिलांप्रमाणे साडी नेसली होती, मेकअप केला होता. त्याने एखाद्या वधूप्रमाणे हातात हिरव्या बांगड्या, कपाळावर कुंकू लावलेले होते. त्याचे दोन्ही हात बांधलेल्या अवस्थेत होते. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. मृतदेहाजवळ बरंच रक्त सांडलेले होते. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दरम्यान, बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे या प्रकरणातील गुंता वाढला आहे. यामुळे तपास सुरू करण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याने काहीही लिहून ठेवले नव्हते. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनास पाठवून तपास सुरु केला आहे.