हरयाणाच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याठिकाणी भाजप आणि जाट नेते दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची (जेजेपी) युती तुटणार हे स्पष्ट झाले. यामुळे याठिकाणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे.
त्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेले मागासवर्गीय समाजाचे नायबसिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता याचा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. एकेकाळी मनोहर खट्टर यांच्या मागे त्यांच्या मोटारसायकलवर बसून आपण रोहतक ते गुरुग्राम असा हरयाणा फिरलो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
असे असताना मात्र भाजपने एका दशकानंतर राज्यात सत्तेच्या मोटारसायकवरून खाली उतरवून देऊन संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त केले. दरम्यान मनोहरलाल हरयाणातून लोकसभेवरही येतील. याचे परिणाम झाले व चौताला यांनी भाजपची साथ सोडल्याचे जाहीर केले. यामुळे अजूनही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, दुष्यंत यांचे १० पैकी ५ ते ६ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. चौताला यांना याच टप्प्यावर सरकारपासून दूर करणे हे भाजपचे खरे लक्ष्य होते, असे काँग्रेसने मागच्या वर्षीच म्हटले होते. आता पुढे काय होणार लवकरच समजेल.
दरम्यान, याचप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपच्या सोबत आलेले एकनाथ शिंदे व अजित पवार गट हे त्यांचे नव्हे, तर केंद्रीय भाजप नेतृत्वाचे असल्याचे दिल्लीत मानले जाते. हरयाणात जस झालं तसच लोकसभेची वेळ साधून भाजप अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याबाबत करेल असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात लोकसभा नाही, तरी आगामी विधानसभा निवडणुकीवेळी असेच चित्र होईल, असेही राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.