क्रुरतेचा कळस! बापानेच पोटच्या ३ पोरींची केली हत्या! पेटीत लपवले मृतदेह, ‘असा’ उघडकीस आला प्रकार

पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात तीन सख्ख्या बहिणींचे मृतदेह एका पेटीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रकरण जालंधरच्या कानपूर गावचे आहे. मुलींच्या वडिलांनी त्यांची हत्या करून मृतदेह पेटीमध्ये लपवल्याचा आरोप आहे.

तीन बहिणी कालपासून बेपत्ता होत्या. तिघीही बेपत्ता झाल्याची तक्रारही पोलिसांत दाखल झाली होती. मुलींच्या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. अमृता कुमारी, साक्षी कुमारी आणि कांचन कुमारी अशी मृत मुलींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी तिघींचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. तिन्ही मुलींचे वडील ड्रग्ज व्यसनी असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यांचे वडील नेहमी दारूच्या नशेत असायचे. लोकांचे म्हणणे आहे कि त्यांनीच मुलींची हत्या करून मृतदेह पेटीमध्ये लपविले आहे.

सध्या पोलिसांनी मुलींच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. मुलींचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सुशील मंडल आणि मंजू मंडल यांना ५ मुले आहेत. रविवारी दोघेही कामावर गेले होते. तो घरी परतला तेव्हा तिन्ही मुली सापडल्या नाहीत. नंतर तिघींचेही मृतदेह पेटीच्या आत सापडले.

मुलींच्या अंगावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. प्राथमिक तपासात हा खून असल्याचे दिसून येत नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, त्या खेळता खेळता पेटीमध्ये बसल्या आणि वरून झाकण बंद झाले. सध्या आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत.