मुंबईच्या संघातील वाद चव्हाट्यावर, आयपीएलमधून बाहेर पडल्यावर हार्दिकची खेळाडूंनी केली तक्रार, नेमकं काय घडलं?

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे. यामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले आहे. असे होताच संघात मोठा भूकंप झाला आहे. स्पर्धेबाहेर गेल्यावर आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कर्णधार हार्दिक पंड्याची तक्रार केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीममध्ये सुरुवातीपासूनच रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यावर वादाला सुरुवात झाली होती. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला यावर्षी कर्णधार केले. त्यानंतर हार्दिक पंड्याला चाहत्यांनी जोरदार ट्रोल केले. तसेच हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे वाद वाढतच गेला.

या आयपीएलमधून बाहेर पडणारा मुंबईचा पहिलाच संघ ठरला आहे. यामुळे चाहते नाराज असून खेळाडूंवर टीका होत आहे. आता टीम बाहेर गेल्यावर देखील खेळाडूंनी हार्दिकला चांगलेच धारेवर धरले आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू संघाच्या कोचिंग स्टाफला भेटले. त्यावेळी मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंनी कोचिंग स्टाफला संघ का पराभूत होत आहे आणि त्याचे कारण काय आहे, याबाबत सांगितले. अनेकांनी यावेळी हार्दिक पंड्याची तक्रार केल्याची देखील माहिती आहे.

मुंबईच्या खेळाडूंची संघाच्या मॅनेजमेंटबरोबरही आमने सामने चर्चा झाली. या चर्चेमध्ये संघाची कामगिरी का खालावत चालली आहे आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत, हे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मुंबई इंडियन्सचे मॅनेजमेंट यावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामुळे आता येणाऱ्या काळात हार्दिककडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद कायम राहणार का, याची चर्चा सुरू आहे. हार्दिक पंड्यामुळे संघाचे नुकसान झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. या गोष्टीचे पडसाद मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रुममध्ये पडल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या संघात चांगले वातावरण होते. सर्वांचा एकमेकांशी संवाद होता. मात्र यावेळी सगळंच गणित फिस्कटलं आहे.

या सर्व गोष्टींना संघाचा कर्णधार जबाबदार आहे, असे म्हटले जात आहे. रोहित शर्माचे चाहते देखील हार्दिक पांड्यावर नाराज आहेत, तसेच त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आता येणाऱ्या काळात टीम मध्ये काय बदल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.