Hyderabad : हैदराबादेत विमान अपघातानंतर भयानक स्फोट; 2 वैमानिकांचा जागीच मृत्यू, अपघाताची भीषणता वाचून काटा येईल

Hyderabad : तेलंगणातील दिंडीगुल येथे भीषण विमान अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी हैदराबादहून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना Pilatus PC 7 MK II विमान कोसळले. या अपघातादरम्यान भारतीय हवाई दलाचे दोन पायलट विमानात होते.

या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की विमान क्रॅश झाल्यानंतर त्याला आग लागली. त्याचवेळी, अपघाताची कारणे शोधण्यासाठी हैदराबाद भारतीय वायुसेनेला कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तेलंगणातील मेडक जिल्ह्यातील तूप्रन मंडलमध्ये घडली. हवाई दलाचे एक प्रशिक्षण विमान मेडक जिल्ह्यातील तूप्रन नगरपालिका क्षेत्रातील रवेली उपनगरात कोसळले.

ही घटना सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. विमान कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. त्याचवेळी, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, त्यांनी क्रॅश झालेल्या प्रशिक्षण विमानात आग लागल्यामुळे दोन वैमानिकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

तथापि, भारतीय वायुसेनेने मृत्यूची पुष्टी केलेली नाही. हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याने दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे नाकारले होते. तसेच दोन्ही पायलट गंभीर जखमी असल्याचे सांगितले.

येथे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर एक पोस्ट केली की हैद्राबादजवळ झालेल्या या अपघातामुळे मी दु:खी आहे, दोन वैमानिकांना आपला जीव गमवावा लागला हि खूप दुःखत घटना आहे.

या दु:खाच्या क्षणी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत. या अपघातानंतर आयएएफने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते की, आज सकाळी हैदराबाद IAF मधून नियमित प्रशिक्षण उड्डाण करताना Pilatus PC 7 Mk II विमान कोसळले.

भारतीय वायुसेनेने पुष्टी केली की विमानातील दोन्ही वैमानिकांना गंभीर दुखापत झाली आहे. यामध्ये कोणत्याही नागरिकांच्या जीविताचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. अहवाल तयार करण्यात आला आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत. दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूच्या वृत्ताचे खंडन करताना आयएएफने हे ट्विट केले होते.