America : १० वर्षांच्या मुलावर बसली १५४ किलो वजनाची आई, ५ मिनीटांत गुदमरून मृत्यू

America : अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे 150 किलोहून अधिक वजनाच्या महिलेच्या अंगाखाली दबल्यामुळे 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपी महिलेचीही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही महिला त्या मुलाची पालक माता (फॉस्टर मदर) होती.

मीडिया रिपोर्टनुसार, मृत मुलाची ओळख डकोटा लिवाई स्टीव्हन्स या नावाने झाली आहे. तो इंडियानाचा रहिवासी होता. तर आरोपी महिलेचे नाव जेनिफर ली विल्सन (वय 48) असून तिचे वजन सुमारे 154 किलो आहे. महिलेने चौकशीत कबूल केले आहे की ती मुलाच्या अंगावर बसली होती, कारण तिला वाटले की तो खोटे नाटक करत आहे. कोर्टाने तिला सहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

ही घटना 25 एप्रिल 2023 रोजी घडली. पोलिसांना विल्सनच्या घरात स्टीव्हन्स बेशुद्ध अवस्थेत सापडला. तपासात अधिकाऱ्यांना त्याच्या मानेला आणि छातीकडे मारहाणीचे स्पष्ट खुणा दिसल्या. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्याचा मृत्यू झाला.

विल्सनने अधिकाऱ्यांना सांगितले की तो मुलगा घराबाहेर पळून जाऊन शेजाऱ्याकडे गेला होता. जेव्हा त्याला परत आणले, तेव्हा तो वाईट वागू लागला आणि पुन्हा पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी ती सुमारे 5 मिनिटे त्याच्या अंगावर बसली. मात्र, त्याने प्रतिसाद दिला नाही, तेव्हा तिने सीपीआर देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांना कळवले.

ऑटोप्सी रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे की स्टीव्हन्सचा मृत्यू “मेकॅनिकल एस्फिक्सिया”मुळे झाला असून त्याला हत्या मानले आहे. त्याच्या फुफ्फुसाला आणि यकृताला गंभीर इजा झाल्या होत्या.