Sukshma Darshini : दरवर्षी अनेक चित्रपट थिएटर आणि OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतात, पण काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड करतात. 2024 मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळम सस्पेन्स-थ्रिलर ‘सुक्ष्मदर्शिनी’ हा असाच एक चित्रपट आहे, ज्याने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवले.
रहस्यमय कथा आणि जबरदस्त थरार
चित्रपटाची कथा मॅन्युएल आणि त्याच्या शेजारीण प्रियाभोवती फिरते. मॅन्युएल आपल्या आजारी आईसोबत एका जुन्या घरात राहायला येतो आणि सांगतो की त्याच्या आईला अल्झायमर आहे. मात्र, त्याच्या शेजारी राहणाऱ्या प्रियाला त्याच्या वागणुकीवर संशय येतो. तिला वाटते की तो काहीतरी लपवत आहे आणि ती सत्य जाणून घेण्यासाठी त्याच्यावर लक्ष ठेवते.
एके दिवशी मॅन्युएलची आई अचानक गायब होते, त्यामुळे प्रियाचा संशय अधिक वाढतो. तिच्या मते मॅन्युएलने आईसोबत काहीतरी भयानक केले आहे. मात्र, काही दिवसांनी त्याची आई पुन्हा परत येते, पण काहीतरी वेगळं आणि गूढ घडलेलं असतं.
क्लायमॅक्सने प्रेक्षकांना दिला धक्का
चित्रपट संपूर्ण वेळ सस्पेन्स आणि थराराने भरलेला आहे. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खरी गोष्ट समजत नाही आणि क्लायमॅक्स तर पूर्णपणे धक्का देणारा आहे. त्यामुळेच ‘सुक्ष्मदर्शिनी’ OTT वर आल्यापासून प्रथम क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
प्रचंड यश आणि उत्तम रेटिंग
मॅक जिथिन दिग्दर्शित या चित्रपटाने 14 कोटींच्या बजेटवर तब्बल 55 कोटींची कमाई केली. तसेच, IMDb वर 8/10 रेटिंग मिळवत उत्कृष्ट चित्रपटांमध्ये स्थान मिळवले. डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाल्यानंतरही हा चित्रपट टॉप ट्रेंडिंग यादीत राहिला आणि अजूनही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत आहे.
जर तुम्हाला सस्पेन्स आणि थरार असलेले चित्रपट पाहायला आवडत असतील, तर ‘सुक्ष्मदर्शिनी’ हा चित्रपट तुमच्यासाठी नक्कीच एक उत्कृष्ट पर्याय ठरेल!