ताज्या बातम्याक्राईमराजकारण

Dhananjay Munde : कृषी विभागातील बदल्यांसाठी 20,000 ते 1 कोटी, त्यातले धनंजय मुंडेंना किती? रेटकार्ड आलं समोर

Dhananjay Munde : महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी विभागातील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत मांडलेल्या दाव्यानुसार, कृषी विभागातील साहित्य, खते आणि उपकरणांच्या खरेदीत 300 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे सांगितले आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीसाठीही 100 कोटी रुपयांची तडजोड झाली आहे. या बदल्यांसाठी कृषी सहाय्यकांपासून ते उपसंचालकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांकडून 20 हजार रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत रक्कम घेतली गेली असल्याचा दावा धस यांनी केला आहे. त्यांनी या बदल्यांसाठीचे रेटकार्डही जाहीर केले आहे.

धस यांनी सांगितले की, कृषी विभागातील बदल्या आणि पदोन्नतीचे दर खालीलप्रमाणे होते:

  • कृषी सहाय्यक: 60,000 रुपये (त्यातील 20,000 रुपये धनंजय मुंडे यांच्याकडे, उर्वरित 40,000 रुपये विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे)
  • कृषी पर्यवेक्षक: 1,50,000 रुपये (त्यातील 40,000 रुपये धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • कृषी अधिकारी: 3,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • कार्यालयीन कृषी अधिकारी: 2,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • तालुका कृषी अधिकारी: 5,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • कार्यालयीन तंत्र अधिकारी: 4,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • उपविभागीय कृषी अधिकारी: 7,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • कृषी उपसंचालक: 5,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी: 9,00,000 रुपये ते 30,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • विभागीय कृषी सहसंचालक: ठाणे विभागासाठी 80,00,000 रुपये, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 60,00,000 रुपये, अमरावती आणि नागपूर विभागासाठी 40,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)
  • संचालक पद: संचालक निविष्ठा व गुण नियंत्रणासाठी 5,00,00,000 रुपये, इतर संचालक पदांसाठी 2,00,00,000 रुपये (संपूर्ण रक्कम धनंजय मुंडे यांच्याकडे)

धस यांनी असेही सांगितले की, चौकशी बंद करण्यासाठी 25 लाख ते 1 कोटी रुपये घेतले जात होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, 70% ते 80% बदल्या नागरी सेवा मंडळाच्या शिफारशीशिवाय केल्या गेल्या आहेत.

या सर्व बदल्या आणि पदोन्नतीमध्ये धनंजय मुंडे, प्रशांत भामरे आणि रविकिरण पाटील यांनी कृषी आयुक्तालय स्तरावर आणि संपूर्ण महाराष्ट्रात काही ठराविक एजंटची नेमणूक केली होती. धस यांनी असेही सांगितले की, प्रशांत भामरे आणि रविकिरण पाटील यांचे सीडीआर रिपोर्ट, भ्रमण दूरध्वनी आणि व्हॉट्सअपवरील कॉलची माहिती मागविल्यास सर्व एजंटची नावे बाहेर पडतील.

या आरोपांमुळे राज्यातील कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. धनंजय मुंडे यांनी या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Related Articles

Back to top button