Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहलबद्दल धनश्री वर्माने केलेला ‘मोठा’ खुलासा, म्हणाली लॉकडाऊनमध्ये…
Yuzvendra Chahal : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दोघे विभक्त होणार असल्याच्या अफवा वारंवार पसरत होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, दोघांनीही सहमतीने घटस्फोट घेत असल्याची कबुली बांद्रा कोर्टात दिली आहे. घटस्फोटाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
प्रेमकथा सुरू झाली लॉकडाऊनमध्ये
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची ओळख लॉकडाऊन दरम्यान झाली. क्रिकेट सामन्यांना ब्रेक मिळाल्याने चहलने सोशल मीडियावर धनश्रीचे डान्स व्हिडिओ पाहिले आणि तिच्या डान्स क्लासमध्ये प्रवेश घेतला. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर चहलने थेट लग्नासाठी धनश्रीला प्रपोज केले. त्यांच्या प्रेमकथेने अनेक चाहत्यांची मने जिंकली होती.
वाद वाढले आणि घेतला मोठा निर्णय
लग्नानंतर धनश्री अनेकदा क्रिकेटच्या मैदानात चहलला सपोर्ट करण्यासाठी हजर राहत असे. त्याचप्रमाणे चहलही तिच्या डान्स व्हिडिओंना प्रोत्साहन देत असे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये मतभेद वाढल्याचे समोर आले. अखेर न्यायालयात त्यांनी स्पष्ट केले की, मागील १८ महिन्यांपासून ते वेगळे राहत आहेत आणि सहमतीने घटस्फोट घेत आहेत.
पोटगीबाबत चर्चांनाही पूर्णविराम
धनश्री वर्माने घटस्फोटासाठी चहलकडून ६० कोटींची पोटगी घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, तिच्या कुटुंबियांनी यावर स्पष्टीकरण देत या अफवा असल्याचे सांगितले.
आता दोघेही वेगळ्या वाटेवर जात असून, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची उत्सुकता चाहत्यांमध्ये कायम आहे.