Govinda : लग्नाच्या ३७ वर्षांनंतर अभिनेता गोविंदा घेणार घटस्फोट? ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत संबंधांच्या चर्चा
Govinda : बॉलीवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. काही अहवालांनुसार, गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याचे बोलले जात आहे, तसेच त्यांच्या घटस्फोटाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.
गोविंदाचे एका ३० वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत संबंध असल्याच्या अफवा आहेत. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा आणि सुनीता यांच्यात दुरावा आला आहे आणि ते वेगवेगळ्या घरात राहत आहेत. मात्र, या दोघांनीही या विषयावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सुनीता आहुजाने एका मुलाखतीत सांगितले की, ती आणि गोविंदा सध्या वेगळे राहत आहेत. ती मुलांसह एका फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा समोरच्या बंगल्यात आहे. तिच्या म्हणण्यानुसार, पुरुषांवर पूर्ण विश्वास ठेवू नये आणि प्रत्येकजण वेळेनुसार बदलतो. तिने हेही स्पष्ट केले की, लग्नाला ३७ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही ती आता पूर्वीइतकी सुरक्षित वाटत नाही.
गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ मध्ये लग्न केले होते. त्यावेळी सुनीता फक्त १८ वर्षांची होती. या दाम्पत्याला टीना आणि यशवर्धन अशी दोन मुले आहेत. त्यांच्या नात्यातील या अफवांमध्ये किती तथ्य आहे हे भविष्यातच स्पष्ट होईल.