Rajasthan : सिंदूर भरताना नवरदेवाचे हात थरथर कापत होते, नवरीला संशय आला अन्… भरलग्नात नवरीने घेतला धक्कादायक निर्णय

Rajasthan : राजस्थानातील धौलपूरमध्ये एका लग्नसोहळ्यात अनपेक्षित वळण आलं. सर्व विधी सुरळीत पार पडल्यानंतर शेवटी नवरीच्या पाठवणीची वेळ आली. मात्र, याच क्षणी नवरीने सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला. आनंदाच्या वातावरणात अचानक तणाव निर्माण झाला, आणि प्रकरण इतकं वाढलं की पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.

काय घडलं नेमकं?

धौलपूरमधील एका तरुणीचं लग्न करौली जिल्ह्यातील कल्याणी गावातील एका शिक्षकासोबत ठरलं होतं. वरात मोठ्या थाटामाटात आली, आणि लग्नाचे सर्व विधी रात्री पार पडले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी पाठवणीच्या क्षणी नवरीने सासरी जाण्यास नकार दिला, ज्यामुळे वधू-वर पक्षात मोठा गोंधळ उडाला.

नवरीने का घेतला हा निर्णय?

सात फेऱ्यांवेळी आणि सिंदूर लावताना नवरदेवाचे हात थरथरत असल्याचे नवरीने पाहिले. यामुळे तिला त्याच्या तब्येतीविषयी शंका आली आणि तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. शेवटी तिने सासरी जाण्याचा निर्णय बदलला आणि स्पष्ट शब्दांत नकार दिला.

नवरदेवाचे स्पष्टीकरण

नवरीच्या या निर्णयामुळे नवरदेव आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. नवरदेवाने स्पष्टीकरण देत सांगितलं की, हात थरथरण्यामागे कोणताही आजार नव्हता, तर फक्त थंडीमुळे हा प्रकार घडला. त्याने हेही सांगितलं की, नवरीच्या कुटुंबाने लग्नाआधी अनेकदा त्याला पाहिलं होतं, तेव्हा अशी कोणतीही शंका व्यक्त करण्यात आली नव्हती.

पोलिसांचा हस्तक्षेप

नवरीच्या निर्णयामुळे वधू-वर पक्षामध्ये वाद निर्माण झाले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम राहिली. अखेरीस नवरदेवाला नवरीशिवायच घरी परतावं लागलं.

ही घटना स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली असून, लग्नासारख्या महत्वपूर्ण क्षणी अशा निर्णयामुळे समाजात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत