Dhananjay Munde : बीडच्या पालकमंत्रीपदावरून डच्चू देताच धनंजय मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रीया, अजितदादांबाबत म्हणाले…

Dhananjay Munde : महाराष्ट्र सरकारने आज पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये, गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याव्यतिरिक्त बीड जिल्हा देण्यात आला आहे, जो त्यांचा गृहजिल्हा देखील आहे.

दरम्यान, बीडमधील परळीचे आमदार धनंजय मुंडे(Dhananjay Munde) हे मागील सरकारच्या काळात बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पण अलिकडेच जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येवरून विरोधी पक्ष आणि स्थानिक भाजप आमदारांकडून त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला.

या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे सहकारी वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी राजीनामा मागण्यास नकार दिला होता. पण त्यांना बीडचे पालकमंत्रीपद नाकारण्यात आले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्यासह बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा बीडचे माजी पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वागत करत अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्याचा विकास पुणे जिल्ह्याप्रमाणे व्हावा, अशी आशा व्यक्त केली आहे.

धनंजय मुंडे यांनी सांगितले की, बीड जिल्ह्याची सध्याची सामाजिक व राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली होती की, बीड जिल्ह्याचे पालकत्व अजित पवार यांनी घ्यावे. त्यांच्या या विनंतीला मान्यता देऊन अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे.

धनंजय मुंडे यांनी पुढे म्हटले की, सध्या त्यांना कोणत्याही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी न देण्याची त्यांनी विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले असून, आपल्यावर सोपवलेल्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहतील, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, अशी अपेक्षा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकारमधील पालकमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गडचिरोली
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मुंबई शहर आणि ठाणे
उपमुख्यमंत्री अजित पवार – पुणे आणि बीड
चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर
पंकजा मुंडे – जालना
आदिती तटकरे – रायगड
आशिष शेलार – मुंबई उपनगरे
गिरीश महाजन – नाशिक
संजय शिरसाट – संभाजी नगर
राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
हसन मुश्रीफ – वाशिम
चंद्रकांत पाटील – सांगली
गणेश नाईक – पालघर
गुलाबराव पाटील – जळगाव
संजय राठोड – यवतमाळ
उदय सामंत – रत्नागिरी
जयकुमार रावल – धुळे
अतुल सावे – नांदेड
अशोक उईके – चंद्रपूर
शंभूराज देसाई – सातारा
शिवेंद्रसिंह भोसले – लातूर
माणिकराव कोकाटे-नंदुरबार
जयकुमार गोरे – सोलापूर
मेघना बोर्डीकर – परभणी
पंकज भोयर – वर्धा
प्रकाश आबिटकर – कोल्हापूर
बाबासाहेब पाटील-गोंदिया
आकाश फुंडकर – अकोला
नितेश राणे – सिंधुदुर्ग
मकरंद जाधव पाटील – बुलढाणा
प्रताप सरनाईक-धाराशिव
संजय सावकारे-भंडारा
नरहरी झिरवळ-हिंगोली