ताज्या बातम्याआरोग्य

Vital Hospital : डायबेटीस बीपीचा रूग्ण GBS वर मात करत मृत्यूच्या दारातून परतला; वायटल रूग्णालयातील डाॅक्टरांच्या जिद्दीचा विजय

Vital Hospital : पुणे, 22 फेब्रुवारी 2025: धीरज भागवते, वय 54, यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच असामान्य धीर आणि आत्मविश्वास दाखवत महीनाभर मृत्यूशी झुंज देत मृत्यूच्या दारातून परत आले आहेत. पिंपरी, पुणे येथील वायटल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये GBS (गिअन-बरे सिंड्रोम) या दुर्मिळ आणि गंभीर आजारावर त्यांनी यशस्वी मात केली आहे. “माझ्या मुलासाठी, या समाजासाठी जगायचंय,” असे म्हणत त्यांनी उपचारांवर पूर्ण विश्वास ठेवला आणि आजाराला परतवून लावले.

28 जानेवारी 2025 रोजी धीरज भागवते यांना ताप, जुलाब, आणि हातापायातील मुंग्या यासारखी लक्षणे दिसू लागली. प्राथमिक उपचार घेतल्यानंतरही, त्यांची प्रकृती खालावत गेली, ज्यामुळे रात्री 10:30 वाजता त्यांना चालण्यास अडचण येऊ लागली आणि श्वास घेणे कठीण झाले. त्यांना ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले आणि NCV (नर्व कंडक्शन व्हेलोसिटी) टेस्ट केल्यानंतर GBS चे निदान करण्यात आले.

डॉक्टर रामश्याम अगरवाल आणि विक्रम आगलावे यांच्या देखरेखीखाली तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र, सुरुवातीचे उपचारही प्रभावी ठरत नव्हते, आणि भागवते यांची प्रकृती अधिकच खालावत चालली होती. ब्लड प्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या अन्य आजारांनी परिस्थिती आणखीनच कठीण केली. 31 जानेवारीला त्यांच्या नातेवाईकांची परवानगी घेऊन इंट्यूबेशन करण्यात आले. डॉक्‍टर गांधी यांच्या सहाय्याने रात्री उशिरापर्यंत उपचार सुरूच होते, परंतु ऑक्सिजन लेवल वाढत नव्हती.

रात्री 3 वाजता डॉक्टर रामश्याम अगरवाल यांनी काही आवश्यक उपचार दिले, ज्यामुळे ऑक्सिजन लेवल सुधारली आणि पेशंट स्थिर झाला. पुढील काही दिवस फिजिओथेरपी आणि अन्य उपचारांनी सुधारणा होत गेली. 8 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टरांनी ट्रेकिओस्टोमी करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे श्वास घेण्यास अधिक सोयीचे झाले. यानंतर, हळूहळू धीरज भागवते बोलू लागले आणि उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला.

22 फेब्रुवारीला ट्रेकिओस्टोमी बंद करून टाके घेण्यात आले आणि पेशंट पूर्णपणे बरा झाला. त्यांना 1 महिन्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला. धीरज भागवते यांचा एक महिन्याचा हा संघर्ष आणि विजय केवळ डॉक्टरांच्या मेहनतीमुळेच नाही, तर त्यांच्या स्वतःच्या जिद्दीमुळेही घडला. या लढाईत त्यांचा मुलगा आणि संपूर्ण हॉस्पिटल स्टाफचे योगदान अतुलनीय होते.

GBS हा आजार काही नवीन नाही, परंतु त्याच्या तातडीने निदानाची आवश्यकता असते. हा आजार शरीरातील प्रतिकारशक्तीच्या अनपेक्षित प्रतिक्रियेने नर्वस सिस्टमला हानी पोहोचवतो, ज्यामुळे पायापासून वरपर्यंत स्नायूंची शक्ती कमी होते. श्वास घेणे कठीण होते, आणि गंभीर अवस्थेत व्हेंटिलेटरची गरज भासते.

उपचारात इम्युनोग्लोब्युलिन आणि प्लाझ्मा थेरपी यांचा समावेश होतो. योग्य उपचार मिळाल्यास आणि तातडीने निदान झाल्यास, 40-50% रुग्ण बरे होतात.

डॉ. रामश्याम अगरवाल आणि त्यांच्या टीमने दाखवलेली समर्पण भावना वाखाणण्याजोगी आहे. वायटल हॉस्पिटलच्या टीमने हे आव्हान स्वीकारून धीरज भागवते यांना मृत्यूच्या दारातून परत आणले.
अधिक माहिती साठी संपर्क: वायटल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
संचालक
राहूल तिलवाणी
आकाश तिलवाणी

डॉ. रामश्याम अगरवाल
रवि चव्हाण (ऍडमिनिस्टेटर)
8830857982/8669664808

Related Articles

Back to top button