Uddhav Thackeray : अडचणीच्या काळात साथ सोडू नका, उद्धव साहेब तुमची आठवण काढतायत, पुण्यातील मोठ्या नेत्याला भावनिक साद अन्…

Uddhav Thackeray : शिवसेना (ठाकरे गट) अलीकडे सातत्याने धक्के खात असताना, *पक्ष सोडू नका आणि जोमाने काम करा, असा निरोप पुण्यातील माजी आमदार महादेव बाबर यांना देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी *माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून बाबर यांच्याशी संपर्क साधला आणि पक्ष न सोडण्याची विनंती केली.

ठाकरे गटाला मोठी चिंता – बाबर ठाण मांडणार की शिंदे गटात जाणार?

गेल्या काही दिवसांपासून *महादेव बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, सध्या ते ठाकरे गटातच आहेत. यामुळे ठाकरे गटाने त्यांना रोखण्यासाठी *विनायक राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

सामंत यांच्या “मिशन टायगर” ला प्रत्युत्तर देण्यासाठी ठाकरेंनी आपला “कोकणी एक्का” विनायक राऊत यांना पुढे केल्याचे दिसत आहे. लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची प्रत्यक्ष भेट होणार असल्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला धक्का

दरम्यान, दुसऱ्या एका मोठ्या घडामोडीत डॉ. दिनेश परदेशी यांनी ठाकरे गट सोडून भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. परदेशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र, *वैजापूर मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

परदेशी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

ठाकरे गटासमोर आव्हाने कायम

एकीकडे, *महादेव बाबर यांना पक्षात रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते भाजपमध्ये परतत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थिती ठाकरे गटासाठी मोठी अडचण निर्माण करू शकते. आता महादेव बाबर ठाकरेंबरोबर राहणार की शिंदे गटात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.