Virat Kohli : शतक हुकल्या नंतरही किंग कोहलीने एका वाक्यात जिंकली सर्वांची मनं, ऐकाल तर अभिमान वाटेल
Virat Kohli : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट खेळीने संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने जबरदस्त फटकेबाजी करत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यापूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही कोहलीने अशीच कामगिरी करत शतक झळकावले होते. मात्र, या वेळी त्याचे शतक हुकले.
विराट कोहलीने काय सांगितले?
सामन्यानंतर विराट कोहली म्हणाला, “हा सामना पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसारखाच होता. येथे परिस्थिती समजून घेणे आणि स्ट्राईक रोटेट करणे महत्त्वाचे होते. भागीदारी टिकवणेही गरजेचे होते. मी सुरुवातीला खेळपट्टीचा अंदाज घेतला आणि नंतर फलंदाजी केली. माझे टायमिंग, संयम, आणि एकेरी-दुहेरी धावा घेण्याची रणनीती महत्त्वाची ठरली. विशेषतः एकेरी धाव घेतानाचा आनंद वेगळाच असतो.”
शतक हुकल्यानंतर कोहलीची प्रतिक्रिया
शतक हुकल्यानंतर विराट म्हणाला, “प्रत्येक सामन्यात दडपण असते, पण त्याचे व्यवस्थापन कसे करायचे हे महत्त्वाचे असते. आम्ही योग्यरित्या दडपण हाताळले आणि म्हणूनच हा सामना जिंकू शकलो. पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले होते, मात्र आज तसे होऊ शकले नाही. पण शेवटी माझ्यासाठी संघाचा विजयच सर्वात महत्त्वाचा आहे. माझे वैयक्तिक शतक झाले नाही, पण भारत जिंकला, हेच माझ्यासाठी सर्वकाही आहे.”
कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की संघाचे यश हेच त्याच्या खेळीचे अंतिम उद्दिष्ट असते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याने अफलातून खेळ केला, मात्र शतक झळकावण्याची चाहत्यांची अपेक्षा पूर्ण झाली नाही. तरीही त्याच्या या जिगरदार खेळीने संपूर्ण भारताला अभिमान वाटावा, अशीच कामगिरी केली आहे.