Dada Kondke : “साहेब चिडलेत आताच्या आता घरी या…” रात्री साडेअकराला मीनाताईंचा दादा कोंडकेंना फोन, काय घडलं होतं? वाचा भन्नाट किस्सा

Dada Kondke : मुंबई – हिंदुत्वासाठी झटणारे आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढा देणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यांनी आपल्या विचारसरणीने आणि कृतीने अनेकांच्या आयुष्यात अमूल्य योगदान दिले. केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता, त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवला. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांच्या मदतीचा ठसा आजही अनेकांच्या आठवणीत जिवंत आहे. बाळासाहेब आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता-दिग्दर्शक दादा कोंडके यांच्या मैत्रीची गोष्ट ही खासच आहे.

“सोंगाड्या” सिनेमा आणि बाळासाहेबांचा हस्तक्षेप

दादा कोंडके यांचा “सोंगाड्या” हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. पुण्यात या सिनेमाने विक्रमी यश मिळवले, पण मुंबईत त्याला थिएटर मिळणे अवघड झाले. कोहिनूर थिएटरचा मालक कपूर, जो महाराष्ट्रीयन नव्हता, त्याने मराठी सिनेमाला प्राधान्य न देण्याचे ठरवले. दादांनी (Dada Kondke)थिएटर मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु कपूर याने अडचणी निर्माण केल्या.

बाळासाहेबांची मदत

थकून-भागून दादांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली समस्या सांगितली. बाळासाहेबांनी कपूरला फोन केला, पण त्याच्या उद्धट वर्तनामुळे प्रकरण अधिकच चिघळले. “कोण बाळासाहेब? मला माहिती नाही,” असे म्हणत कपूरने त्यांना थेट आव्हान दिले.

यावर बाळासाहेबांनी “अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा” असे ठणकावून सांगितले. त्याच रात्री बाळासाहेबांनी आपल्या शिवसैनिकांसह कोहिनूर थिएटर गाठले. कपूरला समजावून सांगितल्यानंतर “सोंगाड्या” सिनेमा थिएटरमध्ये लागला आणि तब्बल ३७ आठवडे हाऊसफुल्ल चालला.

घट्ट मैत्रीचा प्रारंभ

या घटनेनंतर दादा कोंडके(Dada Kondke) यांच्या मनात बाळासाहेबांविषयी अपार आदर निर्माण झाला. पुढे त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की बाळासाहेब चिडलेले असले तरी मीनाताई कोंडके यांना बोलवत असत. दादांच्या प्रत्येक सिनेमाचे परीक्षण बाळासाहेब स्वतः करायचे आणि आपल्या सूचनाही द्यायचे.

अजरामर आठवणी

बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची मैत्री ही फक्त राजकीय किंवा व्यावसायिक नव्हती, तर ती जिव्हाळ्याची होती. दादा कोंडके(Dada Kondke) यांच्या चित्रपटांनी मराठी माणसाला हसवले आणि बाळासाहेबांच्या हस्तक्षेपाने मराठी चित्रपटसृष्टीला नवा आत्मविश्वास दिला. आजही ही मैत्री अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.