Sania Mirza : सानिया मिर्झासमोरच फराह खानने उदित नारायणबद्दल केले मोठे वक्तव्य, म्हणाली, गालावर किस…
Sania Mirza : बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका फराह खान आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा यांची मैत्री सर्वश्रुत आहे. काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्झाने एका शोमध्ये खुलासा करत सांगितले होते की, ती जेव्हा मुंबईत येते, तेव्हा हॉटेलमध्ये राहण्याऐवजी फराह खानच्या घरीच राहते. या दोघी एकमेकींसाठी अनेकदा सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत असतात.
अलीकडेच सानिया मिर्झा आपल्या मुलासोबत फराह खानच्या घरी पोहोचली आहे. सानियाचे खासगी आयुष्य सध्या चर्चेचा विषय ठरले असून, तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटानंतर तिच्याकडे अधिक लक्ष वेधले जात आहे.
फराह खानचा उदित नारायण यांना टोला
दरम्यान, फराह खानने प्रसिद्ध गायक उदित नारायण यांची मजेदार शैलीत खिल्ली उडवली आहे. नुकताच उदित नारायण यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये ते महिला चाहत्यांना किस करताना दिसले. या व्हिडीओनंतर उदित नारायण यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
फराह खाननेही यावर प्रतिक्रिया देताना सानिया मिर्झाच्या मुलाला गालावर किस करण्यास सांगितले आणि “डू अ उदित जी ऑन मी” असे म्हणत उदित नारायण यांना टोला लगावला. फराहच्या या विधानानंतर उपस्थित सर्वजण हसायला लागले.
सानिया मिर्झाचा फराह खानसोबतचा खास बॉण्ड
सानिया मिर्झाने यापूर्वीही फराह खानच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती. एवढंच नाही, तर अनेक वर्षांपूर्वी फराह खानने सानियाला चित्रपटात काम करण्याची ऑफरही दिली होती.
सानिया सध्या दुबईत जास्त वेळ घालवत आहे. शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले, तरी सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रिय राहून आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.